अहमदाबाद ः वृत्तसंस्था
मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात दुसर्या दिवशीच भारताने इंग्लंडला 10 गडी राखून पराभूत केले. दुसर्या डावात इंग्लंडने भारताला 49 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने कोणतीही विकेट न गमावता अवघ्या 7.4 षटकांत पूर्ण केले. या विजयासह टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे, मात्र अजूनही भारताला अंतिम तिकीट मिळलेले नाही.
इंग्लंडला 10 विकेट्स राखून पराभूत करून भारताने 71.0 टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे, तसेच इंग्लंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये 64.1 गुणांसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. या टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया 69 टक्के गुणांसह तिसर्या स्थानावर आहे. यापूर्वी अंतिम तिकीट मिळवणारा न्यूझीलंड 70 टक्के गुणांसह दुसर्या स्थानावर आहे.
Check Also
प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
घरे नियमित करण्याबाबत सिडकोला निर्देश देण्याची आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी …