ग्लोबल वॉर्मिंग आणि जीवसृष्टीवरील परिणामावर सुधागडात परिसंवाद
पाली ः वार्ताहर
हवामान व तापमानातील होणारे बदल सजीवसृष्टीस हानिकारक ठरू लागले आहेत. पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणे काळाची गरज आहे. याकरिता सामाजिक संघटना पुढे येऊन काम करीत आहेत. ग्रेटा थनबर्ग हिच्या फ्रायडे फॉर फ्युचर या चळवळीत सहभाग म्हणून ग्लोबल वॉर्मिंग आणि जीवसृष्टीवर होणारे परिणाम या विषयावर परिसंवाद व निबंध आणि पोस्टर स्पर्धेचा बक्षीस समारंभ सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावाजवळील एकवीस गणपती मंदिर सभागृहात नुकताच झाला. सिद्धेश्वर सरपंच उमेश यादव यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला. या वेळी वसुंधरेच्या संवर्धनासाठी सुधागड तालुक्यातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, परिसरातील महिला बचतगट, तरुण व ग्रामस्थ, शासकीय व लोकप्रतिनिधी, संघटना प्रतिनिधी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच उमेश यादव यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मोरेश्वर कांबळे, रमाकांत शिंदे, प्रा. डॉ. मधुकर बडगुजर, योगेश सुरावकर व प्राचार्य युवराज महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले. जिल्हा प्रदूषण मंडळ सदस्य प्रमोद राईलकर, वनक्षेत्रपाल समीर शिंदे, प्रा. डॉ. अंजली पुराणिक, रोहिणी जाधव, नथूराम चोरगे, विजय मराठे, ग्रामसेवक गोरठ, गणेश महाले, तुकाराम पवार, विद्या यादव, संजना फाळे, कृष्णा वाघमारे, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक जाधव, आशिष यादव, सागर घोलप, गणेश यादव यांसह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांमध्ये निबंध स्पर्धा प्रथम पारितोषिक राजेंद्र अंबिके, द्वितीय दीक्षा मोरे कल्याण, तृतीय सुनीता कडाळे, साक्षी जाधव, पनवेल आणि रूपाली शिंदे, पोस्टर स्पर्धा प्रथम पारितोषिक विनय निकुंभ, द्वितीय ईश्वरी शिंदे, तृतीय आसावरी रावताळे, उत्तेजनार्थ रुद्र जाधव आणि मोहन पवार आदींचा समावेश आहे.