Breaking News

रायगड जिल्हा भाजप चित्रपट कामगार सेलची स्थापना

पनवेल : रामप्रहर वृत्त

चित्रपट, मालिका व नाट्यक्षेत्रात काम करणार्‍या कलाकार व तंत्रज्ञ यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्याचबरोबर होतकरू कलाकारांना वाव देण्याच्या दृष्टीने भाजप चित्रपट कामगार सेल रायगड जिल्हा कार्यकारिणीची स्थापना रविवारी (दि. 28) पनवेल येथे भाजप चित्रपट कामगार सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय रणदिवे व महाराष्ट्र प्रदेश चिटणीस वैभव जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

या कार्यक्रमात भाजप कामगार संघटना उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कोरडे आदी उपस्थित होते.

या वेळी भाजप चित्रपट कामगार सेलच्या रायगड जिल्हाध्यक्ष नेत्राताई राणे यांनी खालीलप्रमाणे पदाधिकार्‍यांना नियुक्तीची अधिकृत पत्रे प्रदान केली. रायगड जिल्हा-उपाध्यक्षपदी विजय पवार, प्रशांत राय, सरचिटणीसपदी जगदीश नागे, रोशन वंदना कर्णेकर, सचिवपदी प्रकल्प वाणी, अंकुश दुर्गे, मीडिया प्रमुखपदी उदय देवरूखकर, पनवेल तालुकाध्यक्षपदी शामनाथ पुंडे, कर्जत तालुकाध्यक्षपदी संतोष धुळे, खालापूर तालुकाध्यक्षपदी स्वप्नील रसाळ, खालापूर तालुका सरचिटणीसपदी अलंकार भोईर, पेण तालुकाध्यक्षपदी संजय पुंडे, अलिबाग तालुका सरचिटणीसपदी सुजित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यक्रमात संजय रणदिवे, व वैभव जोशी यांनी संघटनेची ध्येय व उद्दिष्टे याबाबत मार्गदर्शन केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply