Breaking News

नागोठण्यात महाशिवरात्रीवर कोरोनाचे सावट

नागोठणे : प्रतिनिधी

येथील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या अखत्यारीतील रामेश्वर मंदिरात गुरुवारी (दि. 11) महाशिवरात्रीचा उत्सव कोरोनाचे नियम पाळून भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

गुरुवारी पहाटे गणेशमहाराज सहस्रबुद्धे यांच्या पौरोहित्याखाली समाजाचे हर्षल दुर्वे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन करण्यात आले. कोरोनाच्या संभाव्य संकटामुळे मंदिराचा गाभारा भाविकांसाठी दिवसभर बंद ठेवण्यात आल्यामुळे भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत होते. सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी दर्शनासाठी मंदिराला भेट दिली असता, विश्वस्त मंडळाचे सचिव प्रदीप दुर्वे यांच्या हस्ते डॉ. धात्रक यांचा सन्मान करण्यात आला. सायंकाळी होणारा पालखी सोहळा पोलिसांच्या सूचनेनुसार स्थगित करण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वस्त मंडळाचे सुभाष गरुडे, प्रदीप दुर्वे, उदय भिसे, शैलेंद्र देशपांडे, अजय अधिकारी यांच्यासह समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply