Breaking News

महायुतीला विकासकामांची पावती जनताच देईल -आमदार प्रशांत ठाकूर

प्रभाग 14मध्ये रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप महायुती केवळ आणि केवळ विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरी जात आहे. दुसरीकडे विरोधकांकडे शहराच्या विकासासाठी कोणतेही व्हिजन नसून महायुतीला हरवणे हे एकमेव उद्दिष्ट ठेवून ते राजकारण करत आहेत, परंतु आम्ही केलेल्या विकासकामांची पावती जनताच देईल आणि या जोरावर महायुती पनवेल महापालिका निवडणुकीत मोठे यश संपादन करेल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रभाग 14मध्ये प्रचारावेळी व्यक्त केला.
पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 14मधील महायुतीचे उमेदवार इक्बाल हुसेन काझी, सारिका अतुल भगत, सतीश दत्तात्रेय पाटील आणि रेणुका मयुरेश नेतकर यांच्या प्रचारासाठी शनिवारी (दि.10) भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मतदारांशी संवाद साधताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोधकांच्या नकारात्मक राजकारणावर जोरदार टीका केली.
महायुतीचा प्रत्येक उमेदवार हा सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण असलेला असून विकासाचा हा रथ पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी ठामपणे सांगितले.
या प्रचार रॅलीत भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, माजी नगरसेवक मुकीत काझी, माजी नगरसेविका सिद्धिका पुंजानी, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, सय्यद अकबर, वर्षा ठाकूर, स्वाती कोळी, जवाद काझी, समिना साठी, मोहम्मद साठी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply