Breaking News

विंडीजचा श्रीलंकेला ‘क्लीन स्वीप’

अँटीगा ः वृत्तसंस्था
डेरेन ब्राव्होच्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना 5 गडी राखून जिंकला. या विजयासह विंडीजने श्रीलंकेला या मालिकेत 3-0ने क्लीन स्वीप केले आहे.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 274 धावा केल्या होत्या. धनुष्का गुणतिलकाने 36 व दिमूथ करुणारत्ने याने 31 धावा केल्या. मधली फळी अपयशी ठरली. श्रीलंकेची 32 षटकांत 6 बाद 151 अशी स्थिती होती. बंडाराने नाबाद 55 धावा केल्या, तर सरंगाने 60 चेंडूंत सात चौकार व तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद 80 धावा ठोकल्या.
विंडीजने हे लक्ष्य 48.3 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. डेरेन ब्रोव्होने 132 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांसह 102 धावांची खेळी केली, तर किएरॉन पोलार्डने 42 चेंडूंत चार चौकार आणि एक षटकारासह नाबाद 53 धावांची खेळी करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. ब्राव्होला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले, तर शाय होप मालिकावीर ठरला. आता उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. 21 मार्चपासून या मालिकेला सुरुवात होईल.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका ः 50 षटकात 6 बाद 274 धावा(गुणतिलका 36, करुणारत्ने 31, निसंका 24, शनाका 22, बंडारा 55, वानिंदू हसरंगा नाबाद 80, अकिल हुसेन 3/33, जेसन मोहम्मद 1/49, अल्जारी जोसेफ 1/51.) पराभूत वि. वेस्ट इंडिज ः 48.3 षटकात 5 बाद 276 धावा (शाय होप 64, डेरेन ब्राव्हो 102, किरोन पोलार्ड नाबाद 55, सुरंगा लकमल 2/56,  वानिंदू हसरंगा 1/49, तिसारा परेरा 1/27, गुणतिलका 1/28.)

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply