Breaking News

कळंबोलीत आघाडी सरकारचा निषेध

भाजपतर्फे जोरदार घोषणाबाजी; गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी

कळंबोली : रामप्रहर वृत्त

कळंबोली शहर भाजपच्या वतीने आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप केले आहेत ते गंभीर आहेत. भारतीय जनता पक्षाने राज्यभर निदर्शने करून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

नितीभ्रष्ट सरकारला खाली खेचण्यासाठी जनतेच मधून आवाज येत आहे. महिला सुरक्षा कोरोना या विषयी सरकार गंभीर नाही आणि पोलीस खात्याचा गैरवापर करून पैसे गोळा करायला सांगतात. अशा ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी कळंबोलीमध्ये निदर्शने करण्यात आली.

या वेळी भाजप कळंबोली शहर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील,  भाजप भटके-विमुक्त सेलचे अध्यक्ष बबन बारगजे, माजी सभापती व नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, जिल्हा चिटणीस अशोक मोटे, युवा मोर्चाचे अमर ठाकूर, सरचिटणीस दिलीप बिस्ट, आबा घुटूकडे, संजय दोडके, महिला अध्यक्ष मनिषा निकम, सरचिटणीस दुर्गा सहानी, सुलभा साठे पुष्पा पंचाक्षरी, सरिता बसोनी, किरण सिंग, केशव यादव, दत्तात्रय भिसे, मच्छिंद्र कुरूंद, संदीप भगत, विलास किठे व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply