Breaking News

चिंध्रण येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण

 भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यात विकासकामांचा पर्व सुरु आहे. त्यानुसार चिंध्रण येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. या रस्त्याचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 1) झाले. या वेळी रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले, तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजीक विकास मंडळाच्या वतीने गावातील मराठी शाळेत वह्यांचे वाटप करण्यात आले.

पनवेल तालुक्यातील चिंध्रण येथे अंतर्गत रस्त्याचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या रस्त्याचे उद्घाटन झाले असून, या वेळी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले, तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून  सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सौजन्याने आणि चिंध्रण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमांना भाजपचे ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, भाजप नेते एकनाथ देशेकर, चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमलाताई देशेकर, शिवाजी दुर्गे, भगवान कडू, महादेव गडगे, एकनाथ मुंबईकर, कुंडलिक देशेकर, काळूराम घोडविंदे, माजी सरपंच कैलास मढवी, चिटणीस नामदेव जमदाडे, रवि पाटील, बाळाराम पाटील, द्वारकानाथ बोराडे, लहू खाने, भालचंद्र सिनारे, अशोक पाटील, लक्ष्मण पाटील, बाळाराम कडू, बाळाराम पाडेकर, शशिकांत खुंटले वाकडी, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply