Breaking News

शासकीय निवासी शाळेतील प्रवेशासाठी संपर्क साधावा

अलिबाग : जिमाका

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जावळी (ता. माणगाव) येथे 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता शासकीय निवासी शाळा सुरु करण्यात आली असून, तेथे मोफत प्रवेश दिला जात आहे. या शासकीय निवासी शाळेची प्रवेशप्रक्रीया 1 एप्रिलपासून झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड -अलिबाग (दूरध्वनी क्र. 02141-222288) येथे संपर्क साधावा किंवा प्रवेश अर्ज विहित नमुन्यात भरुन कागदपत्रासह सहाय्यक शिक्षक निवासी शाळा जावळी (मोबाईल  नं.9511228654) या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन रायगडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त रविकिरण पाटील यांनी केले आहे.

शासकीय निवासी शाळेची वैशिष्ट्ये

शाळा विभाग व निवासाकरता स्वतंत्र इमारती, शासनामार्फत राहण्याची व जेवण्याची विनामूल्य सोय, शासनामार्फत मोफत गणवेश, शैक्षणिक साहित्य, निवासी साहित्य, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा व संगणक कक्ष, भव्य खेळाचे मैदान व क्रीडा साहित्य,डिजिटल स्कूल.

प्रवेश आरक्षण

अनुसूचित जाती-80 टक्के, अनुसूचित जमाती-10 टक्के, अपंग प्रवर्ग-3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती-5 टक्के, तर विशेष मागास प्रवर्ग-2 टक्के.

अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे

विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला, स्वत:चा  नसल्यास वडिलांचा, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला (सरपंच, पोलीस पाटील), विद्यार्थ्यांच्या आधीच्या वर्षाची मार्कलिस्ट, पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड, अपंग असल्यास सक्षम प्राधिकार्‍यांचे अपंग प्रमाणपत्र.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply