Breaking News

‘सण उत्सवांमुळे सामाजिक एकता वृद्धींगत’

रोहे ः प्रतिनिधी

सण, उत्सवांच्या निमित्ताने सर्वधर्मिय लोक एकत्र येत असतात. त्यामुळे समाजातील एकी वृध्दींगत होत असते, असे  प्रतिपादन पोलीस उप अधिक्षक अमोल गायकवाड यांनी केले.

रामनवमी, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, उरूस, महादेववाडी यात्रा यांच्या पार्श्वभुमीवर रोहा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात अमोल गायकवाड मार्गदर्शन करीत होते. रोह्याचे उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, नगर परिषद सभापती समिर सकपाळ, पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परदेशी, मितेश कल्याणी, अमित उकडे, रिक्षा संघटना अध्यक्ष रमेश साळवी, मुस्लीम समाजाचे जाफरभाई येरूणकर, अलिम मुमैरे, बशीर म्हाडकर, इम्तीयज दर्जी, नसीम म्हाडकर, मनोहर सुर्वे, राकेश जैन, हरेश्वर सुर्वे, शांतता समितीचे सदस्य, नागरिक या बैठकीला उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर ऑनलाईन अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना तक्रार करता येते. आचारसंहिता लक्षात घेवून नागरिकांनी आपले सण, उत्सव शांततेत साजरे कारावेत.

-राजेंद्रकुमार परदेशी, पोलीस निरीक्षक, रोहा

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply