Breaking News

खारघरमध्ये पाणी प्रश्नावरून संताप; शुक्रवारी आज करणार निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त
सिडकोने वसविलेल्या खारघरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. येथील नागरिकांना अनियोजित पाणीपुरवठ्याचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी सिडकोकडे करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात भाजप खारघर- तळोजा मंडलच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र याकडे सिडको दुर्लक्ष करीत असल्याने आता भाजप पदाधिकारी उद्या शुक्रवारी (दि. 6) सिडकोचा जाहीर निषेध करणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर करणार आहेत.
सिडकोने वेळोवेळी पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत तारीख देऊन खारघरवासियांची दिशाभूल केली असून शुक्रवारी सकाळी 10 वाजता सिडकोच्या खारघर सेक्टर 14 येथे सुरू असलेल्या गृहसंकुलाचे बांधकाम व खारघर रेल्वेस्टेशनच्या पूर्वेला सुरू असलेल्या गृहसंकुलाचे बांधकाम पूर्णपणे बंद पाडू, यासाठी एकत्र यावे, असे आवाहन भाजप खारघर-तळोजा मंडलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केले आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply