देशातील पायाभूत सुविधा दर्जेदार होणार

नितीन गडकरींची ग्वाही

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आगामी पाच वर्षांमध्ये देशातील पायाभूत सुविधा अमेरिका आणि युरोपसारख्या दर्जेदार होतील. नव्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही एक भक्कम पाया तयार केला असून, यामध्ये गेल्या पाच वर्षांत 17 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत, अशी माहिती दिली. दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते.
देशातील विकासाच्या बाबतीत मागासलेला भाग, पूर्वोत्तर आणि सीमाभागांचा विकास हे सरकारचे सर्वांत मोठे लक्ष्य आहे. ग्रीन एक्स्प्रेस वे कॉरिडोरचे नेटवर्क पूर्णपणे सज्ज आहे. यात दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे आणि 30 किमी द्वारका द्रुतगती मार्गाचा समावेश आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
देशातील सर्व प्रकल्पांवर 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा अभियांत्रिकीचा एक अप्रतिम नमुना असेल. प्रकल्प प्रत्यक्षात आल्यानंतर दिल्ली बॉर्डर सिंगापूरसारखी दिसेल. सीमेवरील रस्ते बांधण्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी ऑस्ट्रेलिया टनेल मॉडेल पद्धतीने काम केले जात आहे, असेही गडकरी म्हणाले.
राष्ट्रीय महामार्गांच्या खासगीकरणामुळे प्रगतीचा वेग वाढणार आहे. यातून मिळालेला निधी मजबूत पायाभूत सुविधांच्या विकासांसाठी वापरला जाऊ शकतो, असे गडकरी यांनी सांगितले.
दिल्ली-मुंबई प्रवास केवळ 12 तासांत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन अंतर्गत 111 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले असून, हरित दृष्टीकोन स्वीकारत पर्यावरणाला हानी न पोहोचवता विकास करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. 22 ग्रीन हायवे कॉरिडोरपैकी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन महानगरांदरम्यान वाहनाने प्रवास करण्याचा वेळ कमी केला जाईल. हा प्रवास 12 तासांत होऊ शकेल. आताच्या घडीला या प्रवासाला 40 तास लागतात, असे गडकरी म्हणाले. 

Check Also

Test post title

Test post content

Leave a Reply