उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालय, द्रोणागिरी (उरण) येथे तालुकास्तरीय ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षिस समारंभ यशस्वीपणे झाला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त विद्यालयात तालुका स्तरीय स्पर्धा 26 व 27 मार्चला झाल्या. त्यात तालुक्यातील एकूण 20 शाळांनी यशस्वीरित्या सहभाग घेतला.
इयत्ता तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन केले होते. यातील विषय होते, कोविड योद्धा व ऐतिहासिक व्यक्तिमत्व. या स्पर्धेसाठी अक्षता गायकवाड व प्रिती वास्कर परीक्षक म्हणून आमंत्रित होत्या. इयत्ता पाचवी ते आठवी या गटासाठी झिरो बजेट गॅझेट मेकिंग (ऑनलाइन विडियोद्वारे) स्पर्धा घेण्यात आली. फॅन्सी ड्रेसमध्ये प्रथम क्रमांक संस्कृती घरत (श्रीमती भागुबाई चांगु ठाकुर विद्यालय); द्वितीय क्रमांक श्रेया भगत (पदाजी पी. मुंबईकर स्कूल); तृतीय क्रमांक स्वरा म्हात्रे (सेंट मेरी कान्वेंट स्कूल, उरण); उत्तेजनार्थ रिना परेश कोठारी, शेख हुर मोहम्मद (मोरू नारायण म्हात्रे, उलवे); गॅझेट मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक कनिष्का घरत (यु.इ.एस. स्कूल उरण); द्वितीय क्रमांक वेदांत गावंड (जांनकीबाई जनार्दन ठाकुर स्कूल); तृतीय क्रमांक अनुष्का घरत (सेंट मेरी कान्वेंट स्कूल, उरण); उत्तेजनार्थ सुकृत म्हात्रे (आय.इ.एस. जे.एन.पी.वी.), प्राची तालबुगे (सी.के.टी. मराठी माध्यम), प्राची तालबुगे (सी.के.टी. मराठी माध्यम) आदींनी प्राविण्य दाखविले.
या स्पर्धांसाठी ईश्वर पाईकराव व एस. डी. म्हात्रे (वाजेकर विद्यालय) यांना परीक्षक म्हणून निमंत्रण केले होते. विजयी विद्यार्थ्यांना अनुक्रमे दोन्ही गटात प्रथम क्रमांक 2000 रुपये, द्वितीय क्रमांक 1500 रुपये, तृतीय क्रमांक 1000 रुपये रोख परितोषिक देवून गौरवण्यात आले.
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची समाजाप्रती असलेली बांधिलकीची जाणीव व अफाट कार्याचा उल्लेख शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा काठे यांनी आपल्या भाषणामध्ये केला. कोविड काळातील सर्व नियमांचे पालन करून शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा काठे, शाळेचे चेअरमन चंद्रकांत घरत, कमिटी मेंबर सुनिल पाटील, शेखर तांडेल, सुरेश पाटील उपस्थित राहिले.
RamPrahar – The Panvel Daily Paper