Breaking News

भाजपचा स्थापना दिन खारघर कार्यालयात आनंदोत्सवाने साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस 6 एप्रिल हा आहे. अंत्योदयाचा विचार घेऊन स्थापन झालेला भाजप हा 13 कोटी सदस्य संख्या असलेला संपूर्ण विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो. 6 एप्रिल 1980 रोजी जनसंघाचे भारतीय जनता पक्षात रुपांतर झाले आणि त्या दिवसापासून 6 एप्रिल हा पक्षाचा स्थापना दिवस म्हणून देशभरात उत्साहात साजरा केला जातो. या अनुषंगाने खारघर येथील जनसंपर्क कार्यालयातही मंडल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापना दिवस आनंदोत्सवच्या रूपात साजरा केला. सर्वप्रथम शहर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल व नगरसेवक अभिमन्यू पाटील यांनी भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, स्व. पंडीत दीनदयाल उपाध्याय व स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रतिमा पूजन करून पुष्पांजली वाहिली. पूजनानंतर भारतमातेचा जयघोष करत घोषणा देण्यात आल्या व पेढे वाटून स्थापना दिवसाचा आनंद साजरा केला गेला. भाजप हा फक्त एक राजकीय पक्ष नसून कार्यकर्ते पक्षाला आपला परिवार मानतात आणि आजच्या दिवशी आपल्या इच्छेनुसार पक्षाला समर्पण निधी देतात. पक्ष परंपरेला अनुसरून आज सर्व उपस्थितांनी समर्पण निधीचे ही संकलन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर उपाध्यक्ष व कार्यक्रमाच्या संयोजिका बीना गोगरी ह्यांनी मांडले.  या कार्यक्रमात पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती अनिता पाटील, माजी स्थायी सभापती प्रवीण पाटील, माजी सभापती शत्रुध्न काकडे, नगरसेवक रामजी बेरा, अ‍ॅड. नरेश ठाकुर, नगरसेविका आरती नवघरे, मंडल उपाध्यक्ष दिलीप जाधव, सरचिटणीस दीपक शिंदे, युवा मोर्चा जिल्हा माजी सरचिटणीस समीर कदम, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष संध्या शारबिद्रे, मंडल महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, सरचिटणीस साधना पवार, ज्येष्ठ नागरिक सेल संयोजक नवनीत मारू, वाहतूक सेल सहसंयोजक विजय उजळंबे, अनुसूचित जाती मोर्चा अनिल साबणे, वैद्यकीय सेल संयोजक किरण पाटील, प्रभाग क्र. 4चे अध्यक्ष वासुदेव पाटील, अशोक पवार, संजय मुळीक, राकेश शर्मा, नरेंद्र कुमार शर्मा, अंकिता वारंग, नीलम विसपुते, सीमा खडसे, नंदा पानसरे, रमेश रमन आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय बूथ पातळीवर सर्व बूथ प्रमुखांनी आपापल्या घरावर भाजपचा झेंडा लावला. महिलांनी घरासमोर रांगोळी काढून दिव्यांची आरास केली, तसेच अनेक बूथमध्ये लहान मुलांना चॉकलेट्स वाटप करून, त्रिसूत्रीचा अवलंब करत सरकारी नियमांचे पालन करून खारघर मंडलात अतिशय हर्ष उल्हासात पक्ष स्थापना दिवस साजरा केला गेला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply