अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात काही भागांमध्ये गुरुवारी (दि. 21) अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र अवकाळी पाऊस बागायतदारांना नुकसानदायक ठरू शकतो.
सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. रणरणत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार गुरुवारी सकाळी रायगड लिल्ह्यात अवकाळी पावसाचा शिडकावा झाला.
गेले दोन दिवस हवामान ढगाळ होते. मध्येच उनही पडते. अशातच राज्याच्या काही भागांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असतानाच रायगडात सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना काही काळ गारवा मिळाला असला तरी शेतकरी, बागायतदार यांच्यासाठी हा अवकाळी पाऊस नुकसान करणारा मानला जात आहे.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …