Breaking News

पनवेल-मुंब्रा महामार्गालगतच्या जलवाहिन्या जीर्ण

महाराष्ट्र प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती; पाण्याचा अपव्यय

पनवेल ः रामप्रहर वृत्त

ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे पनवेल-मुंब्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून जीर्ण जलवाहिन्या बदलण्याची मागणी होत आहे.

पाण्याच्या कमतरतेमुळे शहरामध्ये सध्या आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळला जात आहे तर खारघर व तळोजा वसाहतीमध्ये पाण्याची समस्या मोठी आहे, मात्र पनवेल-मुंब्रा महामार्गावर जलवाहिनीतून गळतीमुळे पाणी वाया जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सध्या अमृत योजनेच्या माध्यमातून पनवेल परिसराला पाणी संपन्न करण्याचे धोरण आखले आहे. याच कामाचा एक भाग म्हणून नवीन पनवेल येथील डीमार्ट ते कळंबोलीपर्यंत जलवाहिनी या दरम्यान अनेक वर्षांपासूनची जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

सुमारे 1600 मीटर लांबीचा आणि 1168 व्यास असलेली जलवाहिनी बदलण्यापूर्वी या जलवाहिनीला रंग देण्याचे काम सुरू असून हे काम मे अखेपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर जलवाहिनी बदलण्याचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. तोपर्यंत ही गळीत थांबवण्याची मागणी होत आहे.

नवीन पनवेल येथील डीमार्ट ते कळंबोली सर्कल व त्यापुढील जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. जलवाहिनी उपलब्ध झाली असून या जलवाहिनीला आतून व बाहेरून गंज लागून खराब होऊ नये, यासाठी रसायनमिश्रित रंग लावण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण झाल्यावर जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेतले जाईल. हे काम अमृत योजनेअंतर्गत होत आहे.

-विजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, एमजेपी

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply