मुरूड : प्रतिनिधी
येथील ग्रामीण रूग्णालयात पुन्हा एकदा लसीकरणास सुरुवात झाल्याने सोमवारी (दि. 12) नागरिकांनी गर्दी केली होती. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे तिनतेरा वाजल्याचेदिसून आले.
सध्या सर्वत्र कोरोना लसीकरण मोहीम राबविली जात आहे. त्या अंनुषगाने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात ही मोहिमेला सुरूवात झाली आहे. मुरूड ग्रामीण रूग्णालयात 7 मार्चपासूनला लसीकरणास सुरुवात झाली होती. 819 जणांनी त्याचा लाभ घेतल्यानंतर लसीकरण बंद करण्यात आले होते. सोमवारी मुरूड ग्रामीण रूग्णालयाला लस प्राप्त होताच लसीकरणासाठी नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे तिनतेरा वाजल्याचे पहावयास मिळाल. शेवटी गर्दी आटोक्यात आणण्याकरिता मुरूड पोलिसांना प्राचारण करण्यात आले.
मुरूड ग्रामीण रूग्णालयाला 200 कोरोना डोस उपलब्ध झाले आहेत. ते सोमवारपासून लाभार्थ्यांना देण्यास सुरुवात झाली आहे.
-डॉ. दिव्या सोनम, ग्रामीण रूग्णालय, मुरूड