Breaking News

कळंबोलीत रक्तदान शिबिरास प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर

बांधिलकी प्रतिष्ठान आणि निर्धार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. 2) कळंबोलीतील गणेश मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळातील या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. एकूण 71 जणांनी या शिबिरात रक्तदान केले.

कोविड-19च्या परिस्थितीमध्ये राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, तो भरून काढण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानाचे खरे शिलेदार हे रक्तदातेच असतात याची पुन्हा एकदा प्रचिती आली. एमजीएम रक्तपेढीच्या अंतर्गत नवी मुंबई ब्लड बँकेचे सहकार्य मिळाले, तसेच अष्टविनायक मित्र मंडळ, सिद्धराज हौसिंग सोसायटी यांचे जागेसाठी सहकार्य मिळाले.

या शिबिरास बांधिलकी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पल्लवी निंबाळकर, खजिनदार विशाल कावरे, उपसचिव स्वप्नील मुटके व सदस्य अशोक घाडगे, वर्षा मोटे, गीतांजली सावंत, सोमनाथ मोरे, श्रीगणेश रुपनवर, प्रतीक्षा कापरे, श्रद्धा वाघमारे, सिद्धी वाघमारे, राहुल चव्हाण, निर्धार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश आहेर, उपाध्यक्ष शुभम वाळके व सदस्य मंगेश शिंदे, अनिल कुंभार, अभिषेक शिंदे, पंकज साळवे, रूपेश दाते, अनुजा माने, किसन माने आदी उपस्थित होते. सुरक्षेचे नियम पाळून शिबिर यशस्वी झाले. भविष्यात रक्तदानाची मोहीम अखंडपणे चालू ठेवण्याचा सर्वांनी मानस व्यक्त केला.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply