Breaking News

देवीचापाड्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : वार्ताहर

तालुक्यातील देवीचापाडा हद्दीतील नागरिकांना पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व स्माईल फाउंडेशन,  सेवा सिमरन जनता सेवा जथा, कोपरखैरणे व बेलापूर गुरुद्वारा यांचे सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम देवीचापाडा, गावदेवी मंदिराच्या मोकळ्या  मैदानात आयोजित करण्यात आला होता. देवीचापाडा परिसरातील गरीब, मोलमजुरी व बिगारी काम करणारे गरजू 300 नागरिकांना 15 दिवस पुरेल इतक्या अन्नधान्याचे  पॅकेटाचे (तांदूळ,  डाळ,  हळदी पावडर पॅकेट, लालमिर्ची पावडर पॅकेट, मीठ, तसेच कांदा व बटाटा) वाटप करण्यात आले. या अन्नधान्य पॅकेटाचे वाटप  शिवराज पाटील, पोलीस उपायुक्त, पनवेल विभाग, तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक काशिनाथ चव्हाण, स्माईल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. धीरज आहुजा, कवलजित सिंग, संदीप सिंग, गुरुप्रीत सिंग, गुरुजींत सिंग, हरपाल सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमावेळी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर वापरणे  या सर्व नियमाचे पालन करण्यात आले.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply