Breaking News

मुरूडमधील आरोग्य केंद्रांना वैद्यकीय साहित्याची भेट

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचा उपक्रम

मुरुड : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या मुरुड शाखेतर्फ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिमीटर, थर्मल स्क्रिनिंग गन, बीपी ऑपरेटिंग मशीन, ग्लुकोमीटर, फोर इन वन स्टिमर आणि  सॅनिटायझरची भेट देण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुरुड ग्रामिण रुग्णालय तसेच तालुक्यातील बोर्ली, नांदगाव, आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी या ठिकाणी काही वैद्यकीय साहित्याची गरज भासत होती. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे मुरुड तालुका अध्यक्ष राजेंद्र नाईक यांनी परिषदेचे सदस्य देवानंद गोगर, जगदीश चवरकर, शरद पाटील, चेतन चव्हाण, भास्कर साळावकर, गजानन दांडेकर, बाळकृष्ण दरणे आणि इतर पदाधिकार्‍यांच्या सहकार्याने तालुक्यातील शिक्षकांकडून स्वेच्छा निधी गोळा केला. या निधीतून मुरुड ग्रामीण रुग्णालय, तसेच बोर्ली, नांदगाव, आगरदांडा येथील केंद्रांना ऑक्सिमीटर, थर्मल स्क्रिनिंग गन, बीपी ऑपरेटिंग मशीन, ग्लुकोमीटर, फोर इन वन स्टिमर आणि प्रत्येकी पाच लिटरचा सॅनिटायझर कॅन आदी साहित्य पुरविण्यात आले.

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply