पेण : प्रतिनिधी
लायन्स क्लब ऑफ पेण प्राईडतर्फे पेण तालुक्यातील कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांना नुकताच मास्क व सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले.
क्लबचे प्रेसिडेंट शशिकांत भगत, व्हाईस प्रेसिडेंट प्रमोद पाठक, सेक्रेटरी राजेश मुळे, विरेंद्र पटेल, डायरेक्टर सुदर्शन शेळके, प्रशांत भगत, प्रांजल पाठक, हेमंत भगत, चेतन तांडेल, कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मिलिंद पाटील, थवई व इतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते.