Breaking News

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर एका तासात तीन अपघात; एकाचा मृत्यू

काही काळ वाहतूक ठप्प

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी (दि. 24) पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात घडले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून या अपघातांमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
पहिला अपघात 5 वाजता पुणे लेनवर झाला. मुंबई लेनवर बोरघाट अमृतांजन ब्रिजच्या दरम्यान हनुमान मंदिराजवळ खासगी प्रवासी बस व अन्य दोन वाहने एकमेकांना धडकली. यात बसमधील चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये रुपाली पाटील (वय 49), चेतन भोसले (वय 32), राजाराम पाटील (वय 59) व आणखी एकाचा समावेश आहे.
दुसरा अपघात पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाट अंतरातच झाला. वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आल्याने चालकाने चालत्या वाहनातून उडी मारली. दुर्दैवाने रस्त्यावर डोके आपटल्याने त्याचा मृत्यू झाला. 6 वाजण्याच्या सुमारास तिसरा अपघात टेम्पो उलटून झाला. मुंबई लेन किलोमीटर 44 या दरम्यान फकोन कंपनी समोर मालवाहतूक टेम्पो उलटला. यात आत अडकलेल्या टेम्पो चालकाला सुरक्षित पणे बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आल्याने पुढील अनर्थ टळला.
या सर्व अपघातांत द्रुतगती मार्गावरील आयआरबी पेट्रोलिंग, आयआरबी देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस अपघाताच्या ठिकाणी मदतकार्य करीत होते. तातडीने जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातातील वाहने आयआरबी कंपनीच्या हायड्राच्या सहायाने सुरक्षित ठिकाणी लावण्यात आली असून या अपघाताने एक तास वाहतूक कोंडी झाली होती.
मृत चालकाचा मृतदेह पुढील शासकीय प्रक्रियेसाठी खोपोली नगरपालिका हॉस्पिटल व नंतर खालापूर प्राथमिक रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत खोपोली पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.

Check Also

स्व. गंगादेवी बालदी यांची शोकसभा; मान्यवरांकडून श्रद्धांजली

उरण : रामप्रहर वृत्तउरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे नुकतेच …

Leave a Reply