Breaking News

एक्स्प्रेस वेवर टँकर उलटला; वाहतूक विस्कळीत

खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी

पुण्याहून मुंबईकडे जाताना रविवारी (दि. 30) पहाटे 6.30 वाजण्याच्या सुमारास एक टँकर (एमएच-17 बीडी-4365) किमी 40.400 आडोशी उतार येथे अपघात होऊन उलटला. चालकाचे नियंत्रण सुटून टँकर मुंबईच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंत व लोखंडी रेलिंग तोडून पुणे लेनवर पलटी होऊन अपघात झाला. अपघातात टँकरचालक गंभीररीत्या जखमी होऊन टँकरमध्ये अडकला होता. यादरम्यान सर्व मदत व अन्य कार्यवाही होईपर्यंत जवळपास दोन तास एक्स्प्रेस वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

अडकलेल्या चालकास पोलिसांनी देवदूत टीमच्या मदतीने बाहेर काढून उपचाराकरिता पनवेल येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. टँकरमधील गुळाची मळी पुणे लेनवर पडल्याने पुणे बाजूकडील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.

आयआरबी व खोपोली नगर परिषद अग्निशमन दलाच्या गाडीला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. रोडवर पडलेली मळी पाणी मारून हटविण्यात आल्यानंतर तिन्ही लेनवरील वाहतूक सुरू करण्यात आली. घटनास्थळी पोलीस मदत केंद्र बोरघाट सपोनि. जगदिश परदेशी, पोउनि. महेश चव्हाण आणि खोपोली नगर परिषद फायर ब्रिगेड, देवदूत टीम यांनी तातडीने मदतकार्य केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply