Breaking News

निसर्ग रक्षणासाठी सहभागी व्हा!

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन

पनवेल : प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग मित्र, पनवेल संस्थतर्फे बुधवारी दि. 5 जून रोजी  चिपळे पूल येथे आयोजित करण्यात आलेल्या गाढी नदीच्या साफसफाई मोहिमेत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेत सर्वांनी निसर्गाचे रक्षण करण्याच्या या प्रयत्नात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

निसर्ग मित्र ही संस्था निसर्ग शिक्षण, निसर्ग संवर्धन, गिर्यारोहण अशा अनेक पातळ्यांवर निसर्गाच्या संवर्धनाचे काम करत आहे. पनवेलमधील गाढी नदीला वाचवण्याचा प्रयत्न ही संस्था करत आहे. हे काम फक्त निसर्ग मित्र संस्थेचे नसून आपल्या सर्वांचे आहे. जर आपण आपल्या नद्या व निसर्ग वाचवू शकलो नाही, तर नद्यांचे रूपांतर गटारात होईल व त्याचा परिणाम मानवाला सहन करावा लागेल. त्यामुळे भविष्याचा विचार करून सर्वांनी निसर्गाचे रक्षण करण्याच्या या प्रयत्नात सहभागी व्हावे.  आपले आजचे प्रयत्न उद्याच्या पिढीला नक्कीच लाभदायक ठरतील, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवाहन केले आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानित्त आयोजित या मोहिमेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह निसर्ग मित्र संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभाग समिती अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक संतोष शेट्टी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य राज पाटील, युवा नेते प्रमोद भिंगारकर, शेखर शेळके,  उपसरपंच किशोर सुरते, डी. के. भोईर, सचिन गायकवाड, मोतीलाल कोळी, नाना पालकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पनवेल तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजीत पाटील तसेच खांदा कॉलनी, नवीन पनवेल, आदई पंचायत गण, सुकापूर, आकुर्ली पंचायत गण, नेरे विभाग, दुंदरे विभाग, विचूंबे विभाग, पनवेल भाजपा युवा मोर्चा तसेच महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभाग झाल्या होत्या. जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी गाढी नदी पात्रातील मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या, काचेच्या बाटल्या, तसेच इतर कचरा साफ करून गाढी नदी स्वच्छता अभियान यशस्वी करण्यात आले. परिसरातील नागरिक व महिला या अभियानात सहभागी झाले होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply