Breaking News

श्रीरंग बारणेंचा विजय निश्चित; शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांचा विश्वास

पनवेल ः वार्ताहर

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा मंगळवारी (दि.16) पनवेल तालुक्यात ग्रामीण विभागाचा प्रचार दौरा झाला. सकाळपासूनच ठिकठिकाणी ग्रामस्थांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ बारणे यांचे स्वागत करून पाठिंबा. ते पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी व्यक्त केला आहे.

पनवेल तालुक्यातील शेडूंग फाटा येथे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार दौर्‍याला सकाळी सुरुवात झाली. त्यानंतर भिंगार, सांगडे, बेलवली, वारदोली फाटा, लोणिवली, पाली-वांगणी, नेरे, कोप्रोली, विहिघर, चिपळे फाटा, हरिग्राम, केवाळे, वाकडी, खानाव आदी भागांत फेरी प्रचार करीत फिरत होती. या प्रचारात उमेदवार खासदार बारणे स्वतः सहभागी झाले होते. ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. गावातील ग्रामदेवतेचे त्यांनी दर्शन घेऊन ज्येष्ठांचे आशिर्वाद घेतले. अनेक महिला मंडळांनी त्यांचे औक्षण केले. विविध सामाजिक संस्था, संघटना यांनी त्यांना पाठिंबा जाहीर करीत त्यांचे स्वागत केले. या वाढत्या प्रतिसादामुळे येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचाच उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येईल, असा दावा जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply