Breaking News

देशातील 18 वर्षांवरील सर्वांचे होणार मोफत लसीकरण

  • केंद्र सरकारने उचचली जबाबदारी
  • पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशातील 18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 7) देशवासीयांशी संवाद साधताना लसीकरणासंदर्भात ही मोठी घोषणा केली.
देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने कोविड योद्धे आणि 45 वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली होती तर 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांचे लसीकरण राज्ये करीत होती. आता 18 वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणार्‍या लसींचा पुरवठा केंद्र सरकार मोफत करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मागचा इतिहास बघितला तर लक्षात येते की, पोलिओ, कांजिण्या अशा साथींवरील लसी विदेशातून भारतात यायला दशके लागली होती, पण भारताने एकाच वर्षात दोन लसींची निर्मिती केली आहे. देशात सध्या सात कंपन्या कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन करीत आहेत. तीन लसींच्या चाचण्या सुरू आहेत. दुसर्‍या देशांशीसुद्धा लसींच्या पुरवठ्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होणार आहेे.

Check Also

यंदाचा नमो चषक भव्य दिव्य स्वरूपात होणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तमागील वर्षी नमो चषक क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्याचप्रमाणे …

Leave a Reply