Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नगरसेविका अरुणा प्रदीप भगत व समाजसेवक प्रदीप गजानन भगत यांच्यामार्फत जागृती महिला मंडळच्या माध्यमातून 5 व 6 जून रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून घरच्या घरी रांगोळी काढून त्या रांगोळीचा एक फोटो व एक रांगोळी काढतानाचा व्हिडिओ ग्रुपवर मागवण्यात आला होता. मोठ्या संख्येने ग्रुपमधील सदस्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. त्यातील विजेत्यांची निवड 13 जून रोजी करण्यात आली, तसेच विजेत्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली. या रांगोळी स्पर्धेत पहिला क्रमांक विनिता वामन (1500 रुपये), दुसरा क्रमांक प्रीती सुळे (100 रुपये), तिसरा क्रमांक नीलम सकपाळ (500 रुपये), चौथा क्रमांक ज्योती सिगवण (बेस्ट सामाजिक संदेश), पाचवा क्रमांक प्राजक्ता पाटील (बेस्ट पारंपरिक रांगोळी) चौथा व पाचवा क्रमांक प्रोत्साहनात्मक म्हणून बक्षीस देण्यात येत आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply