Breaking News

पनवेलमध्ये रस्त्यांची डागडुजी; नगरसेवक राजू सोनी यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी लाइन आळी येथील हनुमान मंदिराजवळील गटारांच्या झाकणांची दुरूस्ती तसेच महानगरपालिकेसमोरील नुकत्याच पडलेल्या पावसामुळे रस्त्याला पडलेले खड्डे भरून घेतले आहेत. पनवेल शहरातील लाइन आळी येथील हनुमान मंदिराजवळील गटारावरील झाकण गटाराच्या आत गेले होते. त्यामुळे येथून ये जा करणार्‍या लोकांना याचा त्रास होत आहे, अशी माहिती येथील मंदिरात असणारे पुजारी यांनी नगरसेवक राजु सोनी सांगितले. त्यांनी लगेच त्याचें स्वीय सहाय्यक मंदार देसाई यांना तेथे पाठवून ते काम तातडीने करून घेण्यास सांगितले. त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर सध्या पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यांना खड्डे पडले होते. तत्परतेने त्या ठिकाणी कामगार वर्ग पाठवून ते खड्डे बूजवून घेतल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply