Breaking News

महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघातर्फे सन्मान सोहळा

नागोठणे ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघातर्फे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व सन्मान सोहळा 2022चे आयोजन सोमवारी (दि. 21) सायंकाळी 6.30 वाजता नागोठणे येथील आठवडे बाजाराच्या मैदानात करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, आमदार भरत गोगावले, कोकण आयुक्त विलास पाटील, कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जि. प. सदस्य किशोर जैन, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, कुणबी समाजाचे रोहा अध्यक्ष शिवराम शिंदे, सर्वधारा जनआंदोलनाच्या संस्थापक उल्का महाजन, पं. स. सदस्य संजय भोसले, बिलाल कुरेशी, म. रा. यु. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राज वैशंपायन, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. सुरेश माने, रोहा वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अरुण शिर्के उपस्थित राहणार आहेत. ख्यातनाम लोकगीत गायक जगदिश पाटील, सुप्रसिद्ध गायिका सोनाली भोईर, हर्षला पाटील, हास्यसम्राट फेम जॉनी रावत, बिग बॉस फेम गायक संतोष चौधरी (दादुस) यांचा गायनाचा कार्यक्रम हे या सन्मान सोहळ्याचे विशेष आकर्षण असणार आहे. या कार्यक्रमासह सन्मान सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष याकूब सय्यद, सचिव संदेश गायकर, खजिनदार प्रवीण बडे, मंजुळा म्हात्रे, श्वेता वैशंपायन, अ‍ॅड. स्वप्नील दिघे यांनी केले आहे.
यांचा होणार सन्मान : तानुबाई बिर्जे सर्वोत्कृष्ट निवेदिका पुरस्कार-वृषाली यादव (एबीपी माझा), सावित्रीबाई फुले सर्वोत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्कार-स्वाती लोखंडे (न्यूज 18 लोकमत), डॉ. बाबसाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार-समाधान पाटील (दैनिक राम प्रहर), आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट स्तंभलेखक पुरस्कार-विनोद राऊत (मुंबई सकाळ), महात्मा फुले सर्वोत्कृष्ट सामाजिक पत्रकार पुरस्कार-मिलिंद तांबे (मुंबई सकाळ), आचार्य बाळशास्त्री जांभेकर सर्वोत्कृष्ट उपसंपादक पुरस्कार-लक्ष्मण आढाव (रायगड टाइम्स).
इतर उल्लेखनीय कामगिरी : स्वरभूषण पुरस्कार-जगदिश पाटील, स्वरसरिता पुरस्कार-सोनाली भोईर, स्वरसागर पुरस्कार-संतोष चौधरी, स्वरसाधना पुरस्कार-हर्षला पाटील, पीटी उषा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार-अभिलाषा म्हात्रे, दौलतराव शिंदे उत्कृष्ट खेळाडू-विवेक शिंदे, ध्यानचंद उत्कृष्ट क्रीडा संघटक-राजेश सुर्वे, आदर्श संपादक-शफी पुरकर, आदर्श शिक्षक-विजय देवकाते.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply