Breaking News

शेतकर्‍यांना पीक कर्जाचे वाटप; भाजप किसान मोर्चाच्या दणक्याने खालापूर सोसायटी वठणीवर

कडाव, खालापूर : प्रतिनिधी

खालापूर विविध विकास सहकारी सोसायटीकडून अनेक शेतकर्‍यांना पीक कर्ज नाकारण्यात येत होते. त्याबाबत भाजपचे किसान मोर्चा कोकण विभाग संघटक सुनील गोगटे यांनी थेट सोसायटीच्या कार्यालयात जावून तेथील अधिकार्‍यांना जाब विचारला होता. त्या वेळी सोसायटीचे सचिव अजय भारती यांनी 20 जूनपर्यत पीक कर्ज वाटप करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले. खालापूर विविध विकास सहकारी सोसायटीकडून ठराविका शेतकरीवगळता अन्य शेतकर्‍यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ  करण्यात येत होती. त्याविषयी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर भाजपचे किसान मोर्चा कोकण विभाग संघटक सुनील गोगटे यांनी काही दिवसांपुर्वी भाजप युवामोर्चाचे प्रमोद पाटील, खालापूर शहर अध्यक्ष राकेश गवाणकर, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष शिरीष कदम, संतोष तांडेल, भालचंद्र पाटील, दत्तात्रेय नामदेव पवार, लवेश कर्णूक, बबन चोरग, मोतीराम कर्णूक, सुभाष पिंगळे, रवींद्र पाटील आणि शेतकर्‍यासह थेट सोसायटीच्या कार्यालयाला धडक दिली होती. शेतीची कामे सुरू झाली आहेत. शेतकर्‍यांना बी बियाणे, अवजारे खरेदी व शेतीच्या कामासाठी पैसे नाहीत, त्यांना त्वरित पीक कर्जाची संपूर्ण रक्कम अदा करावी, अशी मागणी सुनील गोगटे यांनी केली होती. त्या वेळी सोसायटीचे सचिव अजय भारती यांनी 20 जूनपर्यत सर्वांना कर्जाची रक्कम मिळेल असे आश्वासन दिले होते. त्यावर मुदतीत पैसे दिले नाहीत तर, 21 जून रोजी पुन्हा येऊ, असा इशारा गोगटे यांनी दिला होता. त्याचा धसका घेऊन सोसायटीचे सचिव अजय भारती यांनी रविवार असूनसुद्धा 20 जून रोजी फोन करून शेतकर्‍यांना बोलावून त्वरीत पीक कर्जाच्या धनादेशचे वाटप केले.

खालापूर विविध विकास सहकारी सोसायटीच्या दुटप्पी भूमिकेमुळे तेथील अधिकारी अनेक शेतकर्‍यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत होते. हे शेतकरी जागृत झाल्यामुळेच सोसायटीच्या अधिकार्‍यांना धडा शिकविणे शक्य झाले आहे.

-सुनील गोगटे, संघटक, भाजप किसान मोर्चा कोकण विभाग

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply