Monday , January 30 2023
Breaking News

पेणमध्ये 108 सूर्यनमस्कारांचा योग दिन विशेष

पेण : प्रतिनिधी

योगाचे महत्त्व फक्त वजन कमी करण्यासाठी नसून निरोगी जीवन जगण्यासाठी जास्त आहे. म्हणूनच निसर्ग हास्य क्लबचे रूपांतर ऑनलाइन योगामध्ये करुन कोविडच्या महामारीत समस्त योगाप्रेमींना एक संधी उपलब्ध करून दिली असल्याचे योग गुरू हेमंत गवाणकर यांनी सोमवारी (दि. 21) सांगितले. जागतिक योग दिना निमित्ताने सोमवारी सकाळी घेतलेल्या ऑनलाइन योगा सत्रात हेमंत गवाणकर मार्गदर्शन करीत होते. या ऑनलाइन योगा सत्रात पेण, अलिबाग, पनवेल, मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून 45पेक्षा अधिक सदस्य आपल्या घरून सहभागी झाले होते. योग गुरू गवाणकर यांनी तब्बल 108 सूर्यनमस्कार घालणार्‍या सदस्यांचे अभिनंदन केले.  सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील म्हणाल्या की, योगा हा केवळ व्यायाम नसून एक जीवनशैली आहे. शरीर, मन आणि श्वासोच्छवास यांचा योगामध्ये संयोग झाल्याने नुसते शरीरच नाही तर मनाचेही संतुलन रहाते. दरम्यान, जागतिक योगा दिनानिमित्त रविवारी सायंकाळी पेण शहराजवळील तांबडीच्या डोंगरात निसर्गरम्य ठिकाणी मेधा देवधर, अलका भुस्कुटे, नीतू सिंग, अनिता घोडगे, सुवर्णा देवळे, वैशाली पाटील आदींनी हेमंत गवाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगा केला.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply