Breaking News

माथेरानमध्ये पावसाचे धूमशान; 21 दिवसांत ओलांडला 1100 मिलिमीटरचा टप्पा

कर्जत : बातमीदार

पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सध्या तुफान पर्जन्यवृष्टी होत आहे. 1 जूनपासून सुरू झालेल्या पावसाने गेल्या 21 दिवसांत 1100 मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. माथेरानला सरासरी 3050 इतका पाऊस पडतो. या वेळी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा वेग मंदावला होता. 12 जूनपर्यंत जेमतेम 500 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, मात्र 13 जूनपासून पावसाने जोरदार मुसंडी मारली. 16 जूनपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. 21 जूनपर्यंत माथेरानमध्ये 1102 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या चार दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे माथेरानकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. येथील शारलोट तलाव तुडूंब भरून वाहत आहे. लॉकडाऊनमुळे पर्यटक नसल्याने माथेरानमध्ये निरव शांतता आहे. खंड्या, कूटरुक, गोगी, कुकटकुंभा अशा विविध पक्ष्यांचे आवाज ऐकू येत आहेत. पावसाळी वातावरणात माथेरान परिसरात सध्या पक्ष्यांची जत्रा पाहावयास मिळत आहे.

माथेरानमध्ये जोरदार पाऊस असतोच. 1980पासून ते 1995 पर्यंत पाऊस असायचा तसा पाऊस माथेरानमध्ये बरसत आहे. गोगी पक्षी ओरडणे म्हणजे जास्त पाऊस पडण्याचे संकेत. या पक्ष्यांमुळे येथील निसर्ग खुलून दिसत आहे. पक्षी अभ्यासकांसाठी जून आणि जुलै महिना पर्वणीच ठरणार आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पर्यटकांना पक्ष्यांची जत्रा अनुभवण्यास मिळणार आहे.

-पवन गडविर, अध्यक्ष, निसर्ग मित्र संस्था

Check Also

दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम करण्यासाठी आमची तळमळ -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्ततळागाळात दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षमपणे सामोरे जायला पाहिजे ही आमची तळमळ असते, …

Leave a Reply