Breaking News

पेण खारेपाटात कोरोना रुग्णसंख्या वाढली; वढाव गावात प्रतिबंधात्मक कारवाई

पेण : प्रतिनिधी

दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने पेण तालुक्यातील खारेपाट भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. या भागातील बेनवले गावापाठोपाठ प्रशासनाने वढाव गावाला कोरोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या असून, ग्रामस्थांना गावाबाहेर तर बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. वढाव गावात 19 कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने पूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आले असून सात दिवसात रुग्णवाढ थांबली नाही तर पुन्हा सात दिवस कडक निर्बंधासह लॉकडाऊन वाढवण्यात येईल असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. वढाव गावातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले आहे. विनाकारण फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे. गावातील आजारी व्यक्तीची आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणी केली जात आहे. गावात जंतूनाशक फवारणी केली जाणार आहे. वढाव गावात शिबिर घेवून आरोग्य विभागा तफे्र ग्रामस्थांची अँटीजेन तपासणी करण्यात येत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी गावात जनजागृती करून नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत.

कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून वढाव गावात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. ग्रामस्थांना अत्यावश्यक सेवा पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

-पूजा पाटील, सरपंच, वढाव, ता. पेण

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply