Breaking News

बिग बॅश लीग : शफाली करणार सिडनीचे प्रतिनिधित्व

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारताची महिला संघाची सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा या वर्षी महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल)मध्ये सिडनी फ्रेंचायझीचे प्रतिनिधित्व करणार आहे. शफाली पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील फ्रेंचायझी आधारित टी-20 स्पर्धेत खेळेल. हरियाणाची रोहतक येथे राहणारी 17 वर्षीय शफाली टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. तिने 22 सामन्यांत 29.38च्या सरासरीने आणि 148.31च्या स्ट्राइक रेटने 617 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांत शफालीने 23, 47 आणि 60 धावा केल्या. भारताच्या टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या पावलांवर शफालीने पाऊल ठेवले आहे. हरमनप्रीत 2016मध्ये महिला बिग बॅशचा करार करणारी पहिली भारतीय ठरली होती. हरमनप्रीतने सिडनी थंडरचे प्रतिनिधित्व केले. यानंतर स्मृती मंधाना (ब्रिस्बेन हीट) आणि वेदा कृष्णमूर्ती (होबार्ट हरिकेन्स)देखील या लीगमध्ये खेळल्या. आता शफालीबरोबरच डावखुरी फिरकीपटू राधा यादव या लीगमध्ये खेळणार असल्याचे वृत्त आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply