Breaking News

कामोठ्यात गुटख्यासह देशी-विदेशी मद्यसाठा जप्त; पोलिसांची दुकलीवर कारवाई

पनवेल : वार्ताहर

कामोठे वसाहतीमध्ये बेकायदेशीररित्या गुटख्यासह देशी-विदेशी मद्यसाठा करून त्याची विक्री करणार्‍या दोघा जणांविरुद्ध पोलीस गुन्हे शाखा कक्ष 3च्या पथकाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठा हस्तगत केला आहे. कामोठे वसाहतीमधील ब्ल्यू हेवन बिल्डींगच्या कंपाऊंडमध्ये सेक्टर 35 या ठिकाणी बेकायदेशीररित्या केशयुक्त गोवा, तसेच इतर प्रकारचे गुटखे, त्याचप्रमाणे मॅकडोल्ड व इतर मद्याची विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष-3चे सहाय्यक पोलीस निरीक्षक इर्शान खरोटे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे कक्ष 3चे सहाय्यक निरीक्षक शेंडगे, नाईक दिनेश जोशी, राजेश मोरे, सुधीर पाटील आदींच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून आरोपी करण सचदेव (वय 24) व नितीन सचदेव (वय 25) यांना घेतले. या वेळी त्यांच्याकडून मुद्देमालासह रोख रक्कम असा मिळून जवळपास 8620 रुपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याची नोंद कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हेल्मेट वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश …

Leave a Reply