मुंबई ः प्रतिनिधी
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने शनिवारी (दि. 10) मुंबईत आंदोलन केले, मात्र ज्या बैलगाडीतून हे आंदोलन करण्यात आले ती भार जास्त होऊन तुटल्याने मोर्चात एकच गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व इतर नेते तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते बैलगाडीतून आंदोलनात सहभागी झाले, मात्र या वेळी भार अधिक झाल्याने बैलगाडी मोडली आणि जगताप यांच्यासह बैलगाडीत असलेली सर्वच अतिउत्साही मंडळी कोसळली. त्यामुळे काँग्रेसच्या आंदोलनाची फजिती झाली.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper