Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या सभेची पेणमध्ये जोरदार तयारी

पेण : प्रतिनिधी

32 रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप, शिवसंग्राम युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या निवडणूक प्रचारार्थ गुरुवारी (दि. 18) पेण येथे हॉटेल मार्कविस्ट मंथनशेजारी दुपारी 12 वाजता  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेची पेणमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या जाहीर सभेसाठी संपूर्ण रायगडचे लक्ष लागून राहिले असून मुख्यमंत्री या सभेत काय बोलतात याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. या सभेसाठी युतीचे उमेदवार अनंत गीते, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रवीशेठ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सभेची जोरदार तयारी पेण येथे सुरू असून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सभेस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील यांनी केले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply