

रोहा : प्रतिनिधी
रोह्यात गेले चार दिवस ऊन पडले होते. शुक्रवारी (दि. 1) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मात्र ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने सुरुवात केली. पावसाला सुरुवात होताच वीजपुरवठाही खंडित झाला होता. शुक्रवारी रोह्याचा आठवडा बाजार असतो. पावसामुळे या बाजारातील छोट्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे आधीच भातशेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने पुन्हा एकदा रोह्याला वादळी वार्यासह जोरदार तडाखा दिला.