मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी दुसर्या टप्प्यातील निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे. महाराष्ट्रासह 13 राज्यांतील 97 मतदारसंघात हे मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील 10 मतदारसंघांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या मतदारसंघात गुरुवारी मतदान होत आहे. या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांचे हेविवेट उमेदवार उभे असल्याने सर्वांनाच मतदानाविषयी कमालीची उत्सुकता लागून राहिलेली आहे. शिवसेना-भाजप महायुती विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी विरुद्ध वंचित आघाडी असा तिरंगी सामना होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.