Breaking News

दिव्यांग तरुणाचा प्रामाणिकपणा

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यातील पाले गावातील रुपेश म्हात्रे या दिव्यांग तरुणाने त्याला सापडलेले पैशांनी भरलेले पाकिट हे त्याने पाकिटाच्या मालकाचा शोध घेऊन त्याला परत केले. त्याच्या या प्रामाणिकपणाचे अनेकांकडून कौतुक होत आहे.

रुपेश म्हात्रे हा उरण तालुक्यातील पाले या खेडे गावातला तरुण आपल्या उदरनिर्वाहापोटी भेंडखळ येथील युएलए या कंपनीबाहेर एक टपरी टाकून आपला छोटेखानी व्यवसाय करतो. नेहमीप्रमाणे टपरी बंद करून घरी जात असताना त्याला पाणदिवे-पिरकोन या मार्गावर एक पाकिट सापडले. रुपेशने पाकीटाची पाहणी केली असता त्याला त्यात सात ते आठ हजार रुपये, एटीएम, पॅन कार्ड, आधार कार्ड व इतर छोटे दस्तऐवज दिसले. दस्तऐवजावरून हे पाकिट आवरे गावातील विशाल विष्णू गावंड याचे असल्याचे समजल्यावर रुपेशने सोशल मिडीयावर मेसेज व्हायरल करून तो मेसेज विशाल गावंडपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. त्यानंतर ते पाकिट विशाल गावंडच्या हातात जसेच्या तसे पोहच केले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply