शिमला ः हिमाचल प्रदेशात दरड कोसळून नऊ पर्यटकांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. सांगला खोर्यात किन्नोरच्या बटसेरीत ही दुर्घटना घडली. दरड कोसळतानाची घटना कॅमेर्यात कैद झाली असून डोंगवरावरून दगडे वेगाने खाली खोर्यात कोसळत असल्याचे दिसत आहे. दरड नदीवर असणार्या पुलावर कोसळल्यानंतर पुल नदीत कोसळतानाही व्हिडीओत दिसत आहे. मृत झालेले सर्व पर्यटक असून त्यांच्या वाहनांवर दगडे कोसळली, अशी माहिती किन्नोरचे पोलीस अधीक्षक साजू राम राणा यांनी दिली आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांची एक टीम सध्या घटनास्थळी दाखल आहे, तर प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले असून मदत पुरवली जात आहे.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …