Breaking News

भारताच्या प्रिया मलिकला सुवर्णपदक; जागतिक कुस्ती स्पर्धा

हंगेरी ः वृत्तसंस्था

हंगेरी येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताची कुस्तीपटू प्रिया मलिकने सुवर्णपदक जिंकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचल्यानंतर जागतिक कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिकने मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे आनंद व्यक्त होत आहे. प्रिया मलिकने जागतिक कुस्ती स्पर्धेच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. प्रियाने बेलारुसच्या कुस्तीपटूला 5-0ने पराभूत करीत सुवर्णपदक आपल्या नावे केले. प्रियाने याआधी 2019मध्ये खेलो इंडियात सुवर्णपदक, 2019च्या स्कूल गेम्समध्ये सुवर्णपदक आणि 2020च्या राष्ट्रीय कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकाविले होते.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply