Breaking News

टोकियो ऑलिम्पिक : सिंधूची नॉकआऊटमध्ये धडक

टोकियो ः वृत्तसंस्था

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमधील आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत आणखी एका विजयाची नोंद केली. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केल्यानंतर महिला एकेरीच्या ग्रुप स्टेज सामन्यात हाँगकाँगच्या चेंयुग गँन यीचा सहज पराभव केला. सिंधूचा हा दुसरा विजय असून, तिने नॉकआऊट फेरीत प्रवेश केला. रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले आहे. ग्रुप स्टेज मॅचमध्ये इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा पराभव केल्यानंतर सिंधूने ऑलिम्पिक स्पर्धेत दुसर्‍या विजय मिळवला. ग्रुप स्टेजमध्ये सिंधूचा हाँगकाँगच्या चेंग गँन यीसोबत सामना झाला. या वेळी सिंधूने जबरदस्त प्रदर्शन करीत सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली. सिंधूने पहिला सेटमध्ये 21-9 अशा फरकाने आघाडी घेतली. 15 मिनिटे चाललेल्या पहिल्या सेटमध्ये हाँगकाँगच्या गँन यीकडून चुका झाल्या. याचा सिंधूने पुरेपूर फायदा घेत पहिल्याच सेटमध्ये सामना आपल्या बाजूने फिरवला. दुसर्‍या सेटमध्ये हाँगकाँगच्या चेंन गँन यीने वापसी केली. त्यामुळे सिंधूला तगडी फाईट द्यावी लागली. दुसर्‍या सेटमध्ये एका क्षणी दोन्ही खेळाडू 14-14 अशा बरोबरीत होत्या. त्याचवेळी सिंधूने चांगला खेळ करीत दुसर्‍या सेटमध्येही आघाडी घेतली. सिंधूने दुसरा सेट 21-16 अशा फरकाने आपल्या नावे केला. एकूण 35 मिनिटे चाललेला हा सामना सिंधूने 21-9, 21-16 अशा फरकाने जिंकला. महिला एकेरीच्या ग्रुप स्टेज सामन्यात सलग दुसरा विजय मिळवत सिंधूने नॉकआउट फेरीत प्रवेश केला आहे.

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply