Breaking News

तिरंदाज दीपिका कुमारी अंतिम-16मध्ये दाखल

टोकियो ः वृत्तसंस्था

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची तिरंदाज दीपिका कुमारीने अपेक्षेप्रमाणे कामगिरी बजावत अंतिम 16मध्ये स्थान पटकाविले आहे. तिने अमेरिकेच्या जेनिफर मुसिनो फर्नांडिसचा 6-4 असा पराभव केला. दीपिका कुमारीने जेनिफर फर्नांडिसविरुद्धच्या लढतीत पहिला सेट गमावला होता. दीपिकाने पहिल्या सेटमध्ये 25 गुण मिळवले, तर फर्नांडिसने 26 गुण मिळवले होते, पण दीपिकाने दुसर्‍या सेटमध्ये आघाडी घेत 28 गुण मिळवले, तर फर्नांडिसला 25 गुण मिळाले. तिसरा सेटदेखील दीपिकाने जिंकला. यामध्ये तिला 27 गुण, तर फर्नांडिसला 25 गुणच मिळवता आले. 2009मध्ये युवा विश्वचषक स्पर्धेत 15व्या वर्षी विजेतेपद पटकावणार्‍या दीपिकाने मग 2010च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदके कमावली, मात्र 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ आपला प्रभाव दाखवू शकली नाही. मग पुढील चार वर्षांनी रिओमध्येही भारताने तोच कित्ता गिरवला. कारकीर्दीतील तिसर्‍या ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान नावावर असणार्‍या दीपिकाला तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले, परंतु गेल्या पाच वर्षांत रांचीच्या दीपिकाची कामगिरी कमालीची सुधारली आहे. पाच विश्वचषक पदके तिच्या नावावर आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply