माणगाव : प्रतिनिधी
येथील जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे पथक चिपळूण येथील पूरग्रस्त भागात गेले असून, तेथे त्यांचे मदतकार्य सुरू आहे. हे पथक पुरग्रस्तांना जीवनाआवश्यक साहित्याचे वाटप करणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी दिली.
चिपळूणच्या पुरग्रस्त भागात मदतकार्य करण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे पथक गेले असून, त्यांच्या सोबत पाच हजार अन्नधान्य किट, दहा हजार ब्लँकेट, पाच हजार बिस्लेरी बॉटल, औषधे, बिस्कीटे, दूध पावडर आदी जीवनाआवश्यक साहित्य पाठविण्यात आले आहे. या सर्व साहित्याचे वाटप जिजाऊ पथकातील सदस्य पूरग्रस्तांना करणार आहेत.