पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनानुसार पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व जाणीव एक सामाजिक संस्थाचे संस्थापक नितीन जयराम पाटील यांच्याकडून महाड येथील पूरग्रस्तांना तांदूळ, दोन डाळी, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, अशी शिधासामुग्री देण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पनवेल नगरी यांच्या माध्यमातून ही सामुग्री महाडमध्ये पाठविण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक महाड व चिपळूण येथे अत्यंत दुर्गम भागात जाऊन शिस्तबद्ध पद्धतीने काम करीत आहेत.