Breaking News

खोपोलीतील पूरग्रस्तांना शासनाने मदत करावी

भाजप नगरसेविकेचे तहसीलदारांना निवेदन

खोपोली : प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग 11 मधील अनेक घरांत पूराचे पाणी घुसून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पुरग्रस्तांना शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका अपर्णा मोरे यांनी गुरुवारी (दि. 5) खालापूरचे तहसीलदार इरेश चपलवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग 11 मधील कृष्णानगर, भाऊ कुंभार चाळ, वीणानगर व परिसरातील नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरून घरातील विजेची उपकरणे अन्नधान्य, कपडे, फर्निचर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याठिकाणी मोलमजुरी करणारे सामान्य नोकरदार रहात असल्याने,  तहसीलदारांनी पुढाकार घेऊन शासन स्तरावर या पुरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, असे नगरसेविका अपर्णा मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

भाजप नगरसेविका अपर्णा मोरे यांनी गुरुवारी खालापूर तहसील कार्यालयात जावून इरेश चपलवार यांना निवेदन दिले. या वेळी भाजपचे खोपोली शहर सरचिटणीस हेमंत नांदे, रायगड जिल्हा कामगार मोर्चा सहसंयोजक सूर्यकांत देशमुख,भाजप ओबीसी सेलचे नेते सचिन मोरे तसेच सुधाकर दळवी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply