Wednesday , June 7 2023
Breaking News

पर्यटकांना वाचवणारे पोलीस शिपाई प्रशांत लोहार यांचा मुरूडमध्ये सत्कार

मुरूड : प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुरूडमधील   पद्मदुर्ग व्यवसायिक कल्याणकारी मंडळाने पर्यटकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार्‍या पोलीस शिपाई प्रशांत लोहार यांचा सत्कार केला.

काशीद समुद्र किनारी बुडत असणार्‍या पुणे येथील तीन पर्यटकांना वाचवण्यासाठी प्रशांत लोहार यांनी शर्थीचे प्रयत्न करून जीवरक्षक व स्पीड बोटीची मदत घेत त्यांचे प्राण वाचवले होते. या कामगिरीची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने लोहार यांचा सत्कार केला होता. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पद्मदुर्ग व्यवसायीक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुछ व प्रमाणपत्र देऊन पोलीस शिपाई लोहार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर, मुरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन गवारे, दामोदर खारगावकर, शैलेश वारेकर, महेंद्र पाटील, ज्योती मसाल व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply