कोल्हापूर संघ ‘चॅम्पियन’
पाली ः प्रतिनिधी
महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशच्या वतीने कर्जतमधील रॉयल गार्डन येथे आयोजित 10व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यांतील 350 खेळाडूंनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत 15 सुवर्ण, सात रौप्य, तीन कांस्य अशी एकूण 25 पदके मिळवून कोल्हापूर संघाने चॅम्पियनशिप चषक पटकावला.
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, महाराष्ट्र असोसिएशचे खजिनदार मुकेश सोनावणे, संकेत धामंडे, साहेबराव ओहोळ, पौर्णिमा तेली, विकास बडेकर यांच्या हस्ते, तर बक्षीस वितरण भाजप किसान मोर्चाचे कोकण प्रमुख सुनील गोगटे, महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र प्रताप सिंग, किशोर येवले, रवी विशाल सिंग, संदीप पाटील, प्रकाश पार्ट, सचिन लावंड, अबू चाऊस, संजीव वरे, गणेश बोराडे यांच्या हस्ते झाला.
या स्पर्धेमध्ये 13 सुवर्ण, सहा रौप्य, सात कांस्य अशी 26 पदके मिळवूण ठाणे जिल्हा संघ द्वितीय, तर बुलडाणा जिल्हा संघ आठ सुवर्ण, 12 रौप्य, आठ कांस्य अशी 28 पदके मिळवून तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. या वेळी रायगड जिल्ह्यातील पाली येथील खेळाडू अनुज सरनाईक व अन्य खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.
या स्पर्धेतून यशस्वी खेळाडूंची हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या वेळी सुनील गोगटे यांनी पदकविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच पिच्याक सिलॅट खेळासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खेळाडूंना आश्वासित केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper