अहमदनगर : प्रतिनिधी
दिवंगत माजी केंद्रीय मंत्री व राज्यातील मात्तबर नेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन मंगळवारी (दि. 13) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने झाले. विखे-पाटील यांच्या कार्याचे या वेळी पंतप्रधानांनी कौतुक केले. प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सोहळ्याला
हजर राहिले.